नवउद्योजकांच्या प्रशिक्षणासाठी शुक्रवारी ‘कॉर्नेल महा-सिक्स्टी’

 

नवउद्योजकांच्या प्रशिक्षणासाठी शुक्रवारी ‘कॉर्नेल महा-सिक्स्टी

अकोला, दि. 10 : नवउद्योजक व उदयोन्मुख उद्योजकांच्या प्रशिक्षणासाठी ‘कॉर्नेल महा-सिक्स्टी’ कार्यक्रम दि. 12 जानेवारी रोजी सकाळी 10.30 ते दु. 2 या वेळेत येथील चिवचिव बाजार परिसरातील श्रीमती मेहरबानू महाविद्यालयात सभागृहात होणार आहे.

राज्याच्या नविन औद्योगिक धोरणान्वये नवउद्योजक आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना आवश्यक कौशल्य व प्रशिक्षणासह सुसज्ज करण्यासाठी अमेरिकेतील कोरोनेल विद्यापीठाच्या सहकार्याने ‘कॉर्नेल महा-सिक्स्टी’ कार्यक्रम  राबविण्यात येत आहे. त्यात आतापर्यंत 73 नवउद्योजकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व स्टार्टअप्स, नुकतेच उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, महिला, युवक, नवउद्योजक व स्थानिक उद्योजक, तसेच उद्योग करू इच्छित असलेली व्यक्ती अशा व्यक्तींना सक्षम करणे हा कार्यक्रमाचा हेतू आहे.  उद्योगाबाबत सखोल माहिती व प्रशिक्षण यावेळी देण्यात येईल. उदयोन्मुख उद्योजकांनी, युवक युवतींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ