रासेयो शिबिरातून ‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’बाबत जनजागृती

 





                   रासेयो शिबिरातून ‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’बाबत जनजागृती

अकोला, दि. २२ : नवमतदारांना ‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’बाबत माहिती मिळावी व जनजागृतीसाठी अकोला पूर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयातर्फे आरएलटी महाविद्यालयाच्या सहकार्याने आपोती येथील कर्मयोगी बाबासाहेब आपोतीकर महाविद्यालयात गुरूवारी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर घेण्यात आले.  
यावेळी विस्तार अधिकारी  मनोज बोपटे, स्वाती माळवे, वंदना चौधरी  यांनी मतदान यंत्रांबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही सहभाग होत प्रात्यक्षिक मतदानाचा अनुभव घेतला. विस्तार अधिकारी  आनंद डिक्कर, प्रा. अरूण खेडकर, डॉ. शैलेश जयस्वाल, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी कविता हेडा, संजय गायकवाड, अरुण माळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ओम आवारे, सूरज ताथोड व नीतेश पराते यांनी परिश्रम घेतले.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ