शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी

22 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अकोला,दि. 5 :  क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांमध्ये जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू,  साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडू व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यासाठी 22 जानेवारीपूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नियमावलीनुसार सन 2022-23 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी, दिव्यांग खेळाडू आदींकडून दि. 8 ते 22 जानेवारी या मुदतीत अर्ज मागविण्यात येत आहे. क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरील ऑनलाईन अर्ज सादर करावा व त्याची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे. 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ