चर्मकार प्रवर्गातील २५ हजार युवक-युवतींना स्वरोजगाराची संधी

 चर्मकार प्रवर्गातील २५ हजार युवक-युवतींना  स्वरोजगाराची संधी


अकोलादि. १७ : चर्मकार प्रर्वगातील युवक-युवतींना आणि महिलांना दर्जेदार उद्योजकता विकास आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यासाठी 'लिडकॉमआणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे ३ वर्षांत २५ हजार चर्मकार प्रवर्गातील युवकांना प्रशिक्षण मिळेल.

या करारावर लिडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्ज्योती गजभिये आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे केंद्र प्रमुख तथा राज्य समन्वयक हेमंत वाघमारे यांनी स्वाक्षरी केली आहे. प्रशिक्षणात चर्मकार उद्योगातील व्यवसाय योजनावित्त व्यवस्थापनउत्पादन प्रक्रियाविपणन आणि ग्राहक सेवा यासह विविध विषयांचा समावेश असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षितांना महामंडळाच्या योजना आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल.

या करारामुळे चर्मकार प्रवर्गातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना आणि महिलांना उद्योजक बनण्याची संधी मिळेल. युवक-युवतींनी आणि महिलांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक सहभाग घ्यावाअसे आवाहन गजभिये यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ