वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अकोला, दि. २४ : वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजनेसाठी पात्र वृध्द साहित्यिक व कलावंतांनी  परिपूर्ण प्रस्ताव संबंधित पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्याकडे दि. १५ फेब्रुवारीपूर्वी सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी केले आहे.

निकषांनुसार कला व वाङमय क्षेत्रात ज्यांनी किमान १५ ते २० वर्षे इतक्या प्रदीर्घ काळासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे अशा ५० वर्षांहून अधिक वयाच्या व वार्षिक उत्पन्न ४८ हजार रु. हून कमी असलेल्या व्यक्ती पात्र आहेत. अर्धांगवायू, क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग या रोगांनी आजारी, तसेच ज्यांना ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारिरिक व्यंग असेल किंवा अपंगत्व असेल व त्यामुळे ते व्यवसाय करू शकत नसतील अशा साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी वयाची अट शिथील करण्यात येईल.
वयाने वडील असणाऱ्या विधवा/परितक्त्या वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.
अर्जासोबत जन्मतारीख, रहिवाशी, तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, अपंगत्व, आजाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांचे ऑनलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र, इतर शासकीय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबत नोटरी केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत, कलेसंबंधी
मागील १५ ते २० वर्षाचे आवश्यक पुरावे,
आधारपत्र, संपूर्ण परिचय, पुरस्कार, वृत्तपत्र कात्रणे, पुस्तक प्रती आदी कागदपत्रे जोडावीत. वृध्द साहित्यिक व कलावंत पती, पत्नीचा एकत्र पासपोर्ट आकाराचा फोटो सक्षम अधिकारी यांनी साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचा बँक खाते क्रमांक व बँकेचा आयएफएससी कोड क्र. नमूद करावा.
अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहेत.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ