जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

 

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

             अकोला, दि. 12 : फ्रान्समधील ल्योन येथे जागतिक स्तरावरील कौशल्य  स्पर्धा होणार असून, या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कौन्सिल,  विविध औद्योगिक आस्थापनांच्या जिल्हास्तरावर कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कौशल्यधारक युवकांसाठी ही संधी आहे. अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

ही जगातील सर्वांत मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरूणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलपिंक खेळासारखीच आहे.  युवकांनी विविध ५२  क्षेत्रामध्ये होणा-या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दि. 15 जानेवारीपूर्वी  https://kaushalya.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

                  ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ