जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा




जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अकोला दि. 26 : प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. ध्वजारोहण सोहळ्यानंतर जिल्हाधिका-यांनी अधिकारी, कर्मचारी व सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

०००००


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ