पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी गावस्तरीय यंत्रणा सक्षम व्हावी

पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी गावस्तरीय यंत्रणा सक्षम व्हावी



सीईओ बी .वैष्णवी यांचे प्रतिपादन

अकोला, दि. 8 : जल जीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागात शुद्ध, शाश्वत प्रतिव्यक्ती 55 लिटर पाणीपुरवठा करून द्यायचे आहे. पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी जलसुरक्षक व पाच महिला सदस्य यांची भूमिका महत्वाची आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन सक्षम करावे व नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी येथे दिले. 


जि. प. पाणी व स्वच्छता विभागामार्फत शुक्रवारी आयोजित जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेत त्या बोलत होत्या. मिशनच्या प्रकल्प संचालक अनिता तेलंग, भूजल सर्वेक्षण वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड,   गटविकास अधिकारी गजानन अगर्ते, ज्ञानेश्वर रुद्रकार, मिलिंद मोरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

 कार्यशाळेत गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी पंचायत व आरोग्य, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळेचे तंत्रज्ञ व रसायनी यांनी सहभाग घेतला. मिशनच्या कामांचे मूल्यमापन व मार्गदर्शक सूचना याबाबत देवांगणी काळे  व माहिती, शिक्षण, संवाद सल्लागार राजेश डहाके यांनी मार्गदर्शन केले. पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण प्रणालीबाबत गुणवत्ता तज्ज्ञ ममता गनोदे यांनी माहिती दिली.  प्रास्ताविक श्रीमती तेलंग व सूत्रसंचालन श्री श्री. डहाके यांनी केले. सहाय्यक लेखाधिकारी संदीप नृपनारायण व कनिष्ठ प्रशासन अधिकारी ओमप्रकाश बरेठी यांनी परिश्रम घेतले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ