महासंस्कृती महोत्सवाची तयारी सुरू; समित्या गठित

 

महासंस्कृती महोत्सवाची तयारी सुरू; समित्या गठित

अकोला, दि. 30 : जिल्ह्यात दि. 12 ते 16 फेब्रुवारीदरम्यान पाच दिवसांचा महासंस्कृती महोत्सव घेण्याचे नियोजन असून, जिल्हा प्रशासनाकडून त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. महोत्सवाच्या समन्वय व संनियंत्रणासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय व संनियंत्रण समिती गठित करण्यात आली असून, त्यात जि. प. सीईओ, पोलीस आयुक्तांसह अनेक अधिका-यांचा समावेश आहे. निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असून, अशासकीय सदस्यांमध्ये डॉ. गजानन नारे, सीमा शेट्ये, किशोर बळी, प्रशांत असनारे, प्रा. मधु जाधव, गीताबाली उजवणे, रमेश थोरात, दिलीप देशपांडे, सचिन गिरी, पुष्पराज गावंडे यांचा समावेश आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन व समारोप कार्यक्रम समिती गठित करण्यात आली असून, त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त व इतर अधिका-यांचा समावेश आहे. अप्पर जिल्हाधिकारी सदस्य सचिव आहेत.

त्याचप्रमाणे, प्रचार व प्रसिद्धी समिती, साहित्यिक उपक्रम समिती, महिला समिती, सूत्रसंचालन समिती, पंचकमेटी समिती, सांस्कृतिक व विविध स्पर्धा समिती, विविध प्रदर्शने समिती, आरोग्य उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सेवा समिती, उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा, मैदान व्यवस्थापन, वाहतूक समिती, तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांच्या समावेशासह भोजन व निवास व्यवस्था समिती, बैठक व्यवस्था समिती, अति. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा व्यवस्था समिती आदी समित्या गठित करण्यात आल्या आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ