कोविड प्रतिबंधक उपाययोजना; चाचण्यांचे प्रमाण वाढविले

 

        कोविड प्रतिबंधक उपाययोजना; चाचण्यांचे प्रमाण वाढविले

 

अकोला, दि. 3 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यामुळे चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. 27 डिसेंबर ते 2 जानेवारीदरम्यान 1 हजार 441 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

 

            जिल्ह्यात आजमितीला एकूण चार सक्रिय रूग्ण आहेत. त्यात दोन रूग्ण पंचगव्हाण व एक मोर्शी (अमरावती) येथे आहे. सौम्य लक्षणांमुळे तिन्ही रूग्ण गृहविलगीकरणात आहेत. मंगरूळपीर तालुक्यातील एका व्यक्तीला कोविड-१९ ची  बाधा झाल्याचे आढळले असून, ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, जोखमीच्या व्यक्तींनी गर्दीत न जाणे, कुठलीही सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी झाल्यास त्वरित नजिकच्या संस्थेत तपासणी करून घेणे आदी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ