फसव्या संकेतस्थळापासून सावध राहण्याचे ‘महाऊर्जा’चे आवाहन

 

महाकृषी ऊर्जा अभियानात सौर कृषी पंपाचा लाभ

फसव्या संकेतस्थळापासून सावध राहण्याचे ‘महाऊर्जा’चे आवाहन

 

     अकोला, दि. २ : महाकृषी ऊर्जा अभियान- पीएम कुसुम योजनेत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यात येतात. त्यासाठी लाभार्थी हिस्सा भरून घेतला जातो. हा लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी काही समाजकंटकांकडून खोटे संदेश, फसवे संकेतस्थळ दर्शवून शेतक-यांची फसवणूक होत असल्याचे आढळले आहे. अशा फसव्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन ‘महाऊर्जा’तर्फे करण्यात आले आहे.

  पीएम कुसुम योजनेत शेतक-यांना तीन, पाच व साडेसात अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषी पंप देण्यात येतात. त्यासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांकडून 10 टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांकडून 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरून घेतला जातो. काही फसव्या संकेतस्थळ, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हिस्सा भरण्याबाबत संदेश पाठविले जातात व शेतक-यांची फसवणूक केली जाते. अशा खोट्या संकेतस्थळ, ॲपला बळी पडू नये व पैशाचा भरणा करू नये, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे.

‘महाऊर्जा’कडून लाभार्थी हिस्स्याबाबत एसएमएस पाठविला जातो. त्याचप्रमाणे,  स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले असुन ‍लाभार्थी शेतकऱ्यांनी त्याचा वापर करावा.     https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B  या लिंकचा वापर करावा. या ऑनलाईन लिंकव्यतिरिक्त महाऊर्जामार्फत कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येत नाहीत. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, महाऊर्जा, अकोला दूरध्वनी क्र.0724-2452311 व domedaakola@mahaurja.com   वर संपर्क साधावा तसेच विभागीय कार्यालय, महाऊर्जा, अमरावती दुरध्वनी क्र.0721-2661610 व domedaamravati@mahaurj.com वर संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ