स्वाधार योजनेत अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारीपर्यंत

 स्वाधार योजनेत अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारीपर्यंत

अकोला, दि. 29 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करण्यास दि. 31 जानेवारीपर्यंत मुदत असून, विद्यार्थ्यांनी तत्काळ अर्ज करावा, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

काही विद्यार्थ्यांच्या परिक्षेचे निकाल बाकी असल्यामुळे ते अर्ज भरू शकले नाहीत. त्यामुळे अर्ज वाटप तसेच अर्ज स्वीकृतीसाठी दि. 31 पर्यंत मुदत देण्यात आली. पात्र विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन (निमवाडी), पोलीस वसाहत दक्षता नगर येथे कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ