‘जीडीसी अँड ए’ व ‘सीएचएम’ परीक्षेचा निकाल घोषित

 

‘जीडीसी अँड ए’ व ‘सीएचएम’ परीक्षेचा निकाल घोषित

अकोला, दि. 12 : शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळातर्फे मे 2023 मध्ये झालेल्या ‘जीडीसी अँड ए’ व ‘सीएचएम’ परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे.

परीक्षार्थ्यांना निकाल https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन व पासवर्ड वापरून पाहता येईल. निकाल पीडीएफ फॉर्मटमध्ये https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. 

फेरगुण मोजणी करण्यासाठी परीक्षार्थ्यांनी दि. 23 जानेवारी पूर्वी  अर्ज करावा. फेरगुणमोजणी शुल्क भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी फी रु. 75 अधिक बँकेचे चार्जेस याप्रमाणे चलनाद्वारे भरावे. बँकेचे चलन ऑनलाईन प्राप्त करून घेण्याची मुदत 23 जानेवारी (रात्री 22.30) पर्यंत राहील. चलन प्रत्यक्ष बँकेत 25 जानेवारीपूर्वी भरावे, असे जिल्हा उपनिबंधक यांनी कळविले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम