जनावरांच्या लसीकरणासाठी जिल्ह्यात 2 लाख 40 हजार लसी प्राप्त

 

जनावरांच्या लसीकरणासाठी जिल्ह्यात 2 लाख 40 हजार लसी प्राप्त

अकोला, दि. 10 : पशुधनातील लाळ खुरकत हा रोग विषाणुजन्य आजार आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी पशुसंवर्धन विभागाला 2 लाख 40 हजार 600 लसमात्रा प्राप्त असून, जिल्ह्यातील 75 पशुवैद्यकीय संस्थांना वितरित करण्यात आल्या आहेत. सर्व पशुपालकांनी पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले आहे.

अकोला जिल्ह्यात 2 लक्ष 83 हजार 68 गाय व म्हैसवर्गीय जनावरे, तसेच 1 लक्ष 60 हजार 697 शेळ्या, मेंढ्या आहेत. गाय,   जिल्ह्यात लाळ खुरकत प्रतिबंध लसीकरण मोहीम सुरु आहे. लसीकरणापासुन एकही पशुधन वंचित राहणार नाही याची सर्व संस्थाप्रमुखांना दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

या आजारात पशुधनास 105 ते 106 डिग्री या प्रमाणात ताप येतो. या आजाराने दुधाळ जनावरांच्या दुध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. जनावरांच्या खुरामध्ये, तसेच तोंडामध्ये जखमा होतात व त्यांचे खाणे पिणे बंद होऊन रोगप्रतिकारशक्ती कमी होते. गाभण गाय/म्हैस यांचा गर्भपात होऊ शकतो.या रोगाची लागण एका जनावरापासुन दुसऱ्या जनावरास होते. या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे.

शेळ्या, मेंढयांमधील पीपीआर हा रोग देखील विषाणूजन्य असुन या आजारात 105 ते 106 डिग्री या प्रमाणात ताप येतो. नाकातून व डोळ्यांतून सारखे पाणी वाहते. तोंडामध्ये जखमा होतात, श्वास घेण्यास त्रास होतो. जनावरांना हगवण लागुन यामुळे मृत्यु होतो. या रोगाची लागणसुध्दा एका जनावरापासुन दुसऱ्या जनावरास होते. यावरही प्रतिबंधक लसीकरण हा प्रभावी उपाय आहे.

जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी पशुधनास या रोगाची लागण होवू नये यासाठी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन डॉ. बुकतारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरेंद्र अरबट आणि सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन  डॉ. अशोक गवळी  यांनी केले आहे.

                  ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ