मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअरद्वारे शिक्षणाची सुविधा

जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ

अकोला, दि. २ : पहिली ते सातवीच्या मूकबधीर विद्यार्थ्यांना विविध विषय डिजीटल माध्यमातून शिकण्यासाठी सॉफ्टवेअर व टॅब आदी सुविधांचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते येथील शासकीय मूकबधीर विद्यालयात झाला. त्यानुसार ही शाळा आता महाराष्ट्रातील पहिले डिजिटली समावेशक शासकीय मूकबधिर विद्यालय ठऱले आहे.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, कौशल्य विकास सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, समाजकल्याण अधिकारी पी.डी.सुसतकर, ‘लर्न अँड एम्पॉवर प्रा. लि.’चे सीओओ प्रबोध महाजन, नॅशनल फेलो  ऋग्वेद ऐनापुरे, विद्यालयाच्या मुख्याध्यापक अलका मोडक आदी उपस्थित होते.

 




जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या हस्ते यावेळी चार टॅबचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले. हे कर्णबधीरांसाठी भारतातील पहिले बहुभाषिक सॉफ्टवेअर आहे. ते भारतीय सांकेतिक भाषेत शिक्षण, इंटरनेटवरील माहिती व अध्ययनाला सहायक आहे. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकता येईल, असा विश्वास जिल्हाधिका-यांनी व्यक्त केला.

 ‘लर्न अँड एम्पॉवर’ने हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या संशोधनाला रोजगार व उद्योजकता विकास विभागाच्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेत पारितोषिक मिळाले आहे. ‘रेझोनेट लर्निंग’ व ‘साईनअसिस्टिव्ह प्लॅटफॉर्म’ अशी ॲप्लिकेशन्स मूकबधीर विद्यार्थ्यांना शिक्षणात सहाय्यकारी ठरू शकतात.  गणित व इंग्रजी हे विषय सॉफ्टवेअरद्वारे ऑफलाईन शिकणेही शक्य आहे. यामुळे मुले सॉफ्टवेअरच्या साह्याने स्वत:च शिकू शकतील, अशी माहिती श्री. महाजन यांनी दिली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ