‘स्टुडंट इनोव्हेशन’ स्पर्धेतील गुणवंतांचा आज होणार गौरव

अकोला, दि. 25 : विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत जिल्हास्तरीय महाराष्ट्र ‘स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील पाच गुणवंतांचा गौरव उद्या (26 जानेवारी) सकाळी 9.15 वा. मुख्य प्रजासत्ताक दिन सोहळ्यात होणार आहे.

स्पर्धेत जिल्ह्यातील अजय बाळू लोखंडे, सार्थक वैभव ठाकरे, साहिल अली, जवेरिया जरीश, फरहान अहमद यांच्या नवसंकल्पनांची निवड होऊन त्यांना जिल्हास्तरीय विजेते म्हणून घोषित करण्यात आले आहे. सोसायटीकडून त्यांना बीजभांडवल एक लाख रू. व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ