आस्थापनांनी कर्मचा-यांची सांख्यिकी कळवावी - रोजगार केंद्राचे आवाहन

 

आस्थापनांनी कर्मचा-यांची सांख्यिकी कळवावी

-          रोजगार केंद्राचे आवाहन

अकोला दि. 3 : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्‍थापनांनी त्‍याच्‍या आस्‍थापनेवर कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची सांख्यिकी  त्रैमासिक विवरणपत्र नमुना ईआर-1 मध्ये की दि. 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावी, असे आवाहन  जिल्‍हा कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी केले.

            सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्‍थापनांना सेवायोजन कार्यालये प्रत्‍येक तिमाहीस विहित नमुना ईआर-1 मध्‍ये नियमितपणे कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.mahaswayam.gov.in  या संकेतस्‍थळावरुन ऑनलाईन पध्‍दतीने सादर करणे बंधनकारक आहे. त्‍या अनुषंगाने डिसेंबर 2023 अखेर संपणाऱ्या तिमाही नमुना ईआर-1 (ER-1) मधील त्रैमासिक सांख्यिकीय माहीती नोंदणीकृत सर्व आस्‍थापनांनी यापूर्वी दिलेल्या युझर नेम व पासवर्डचा वापर करुन  www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर त्रैमासिक विवरण पत्र विहीत मुदतीत ऑनलाईन पध्‍दतीने सादर करावे.

 प्रत्‍येक आस्‍थापनेने आपला नोंदणी तपशील, आवश्‍यक  सर्व माहीती नोंदवून अद्ययावत करावा. त्रैमासिक ईआर-1 किंवा आपला नोंदणी तपशील अद्यावत करतांना कोणत्‍याही प्रकारची अडचण आल्‍यास akolarojgar@gmail.com या ई-मेल आयडी किंवा जिल्‍हा कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयाच्या दुरध्‍वनी क्रमांक 0724-2433849 अथवा 9665775778  या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ