पाच दिवसांच्या ‘महासंस्कृती महोत्सवा’तून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन परिपूर्ण आराखडा करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

 

 


पाच दिवसांच्या ‘महासंस्कृती महोत्सवा’तून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

 

परिपूर्ण आराखडा करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

 

अकोला, दि. 4 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रांतातील संस्कृतीचे आदानप्रदान, संवर्धन, स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यत पोहचविण्याच्या उद्देशाने अकोला येथे पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे, श्री शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त महानाट्याचे आयोजनही लवकरच केले जाणार आहे. या कार्यक्रमांचे परिपूर्ण आराखडा व नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

 

 महोत्सवाच्या आयोजनाबाबत समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. कुंभार अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, महापालिका उपायुक्त गीता वंजारी, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, समन्वय अधिकारी गजानन महल्ले, ज्योती नारगुंडे, सीमा शेट्ये, दिलीप देशपांडे, सचिन गिरी, पुष्पराज गावंडे, प्रशांत होळकर आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्रातील विविध प्रदेशांतील संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम होतील. श्री शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच भारूड, गोंधळ, पोवाडा, खडी गंमत, कोळीगीत,  लोककलेतील विविध प्रकार, स्थानिक कला प्रकार, नाटक, कवी संमेलन, व्याखानमाला अशा कार्यक्रमांची रेलचेल असेल. स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम यात प्राधान्याने समाविष्ट करण्यात येतील. महिला बचत गटांचे स्टॉलही येथे उपलब्ध असतील.

महासंस्कृती महोत्सव फेब्रुवारी महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. महोत्सवाच्या अनुषंगाने  विविध कार्यक्रमांबाबत स्वतंत्रपणे उपसमित्या तयार कराव्यात. त्याद्वारे प्रत्येक कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करून परिपूर्ण आराखडा निश्चित करावा. महोत्सवाच्या अनुषंगाने तत्काळ जागा निश्चित करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. श्री शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त महानाट्याचे आयोजनही लवकरच केले जाणार आहे. त्यादृष्टीनेही स्वतंत्र आराखडा सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

00000 

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ