बालगृहातील बालकांचा वीर बाल दिवस कार्यक्रमात सहभाग


 

बालगृहातील बालकांचा वीर बाल दिवस कार्यक्रमात सहभाग

अकोला, दि. १ : जिल्ह्यातील बालगृहातील बालकांनी गुरूद्वारा येथे उपस्थित राहून वीर बाल दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.

 

गुरूव्दारा प्रबंधन समिती व बालकल्याण समितीच्या परवानगीने अकोला येथील गुरूद्वारा येथे दि. २६ डिसेंबर रोजी शासकीय निरीक्षणगृह व बालगृह, गायत्री बालिकाश्रम, सुर्योदय बालगृह, उत्कर्ष शिशुगृह येथील प्रवेशित बालकांना कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले. गुरु गोविंदसिंह यांचे लहान सुपुत्र साहिबजादे जोरावर सिंहजी व साहिबजादे फतेहसिंहजी यांच्या शहादत दिवसानिमीत्त २६ डिसेंबर या दिवस वीर बाल दिवस म्हणून कार्यक्रम घेतला जातो.   

शहिद सप्ताहाअंतर्गत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व इतर उपक्रम राबविण्यात आले. यावेळी डॉ. मल्होत्रा यांनी शीख धर्माची स्थापना, धर्मगुरू व शौर्याची परंपरा आदी माहिती चित्रफित व कथाकथनाच्या माध्यमातुन दिली. यावेळी समितीतर्फे लंगरचे आयोजनही करण्यात आले.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, सार्वजनिक बांधकाम अभियंता नितीन आवारे, बाल कल्याण समिती सदस्य प्रा.प्रांजली जैस्वाल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, सखी

वन स्टॉप सेंटरच्या अॅड. मनीषा भोरे, संरक्षण अधिकारी सुनील लाडुलकर, गायत्री बालिकाश्रमाच्या

वैशाली भटकर, भाग्यश्री घाटे, विजयता रायपुरे, सुर्योदय बालगृहाचे प्रशांत देशमुख व शासकीय

बालगृहांचे काळजीवाहक उपस्थित होते.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ