मतदार नोंदणीसाठी ३ व ४ जानेवारीला मोहिम

 

मतदार नोंदणीसाठी ३ व ४ जानेवारीला मोहिम

अकोला, दि. २ : मतदार यादीच्या पुनरीक्षण कार्यक्रमात मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी दि. २२ जानेवारीला होणार आहे. त्यानुसार अद्यापही मतदार नोंदणी न झालेल्या मतदारांची नोंदणी दि. ३ व ४ जानेवारीला घरोघरी जाऊन करण्यात येणार आहे.

अकोला जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, कर वसुली, लिपीक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत घरोघरी मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यात ज्या नवमतदारांची नाव नोंदणी झालेली नाही, अशा पात्र मतदारांकडून मतदार यादीत नाव नोंदणीचे नमुना 6 चे अर्ज भरून घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, मयत व कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी नमुना 7 भरून घेण्यात येणार आहे.

त्यामुळे नवमतदारांनी नोंदणी करून घ्यावी, तसेच यादीत एकापेक्षा अधिक वेळ नाव असणे, लग्न, बदली अशा कारणामुळे कायमस्वरूपी स्थलांतर मतदारांनी दुरूस्ती करून घ्यावी, तसेच मयत मतदारांच्या नातेवाईकांनी नाव वगळणीचा फॉर्म भरून द्यावा. सर्व मतदान केंद्रांवर, तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आदी ठिकाणी दि. 3 व 4 जानेवारी रोजी फॉर्म भरून देता येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ