जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी

 

जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी

अकोला, दि. ४ : जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी, दि. ६ जानेवारी रोजी दु. १२ वाजता नियोजनभवन येथे श्री छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित राहतील.

बैठकीत नियोजन समितीच्या यापूर्वीच्या सभेचे इतिवृत्त कायम करमे, अनुपालन, सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना यासंबंधी मार्च २०२३ अखेरील खर्चास मंजुरी, पुढील वर्षातील प्रारूप आराखड्यास मान्यता देणे, डिसेंबरअखेर खर्चाचा आढावा व त्याला मान्यता देणे, पुनर्विनियोजनास मान्यता देणे आदी विषयांवर निर्णय होणार आहेत.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ