जिल्ह्यात 3 मार्चला राष्ट्रीय लोकअदालत

 

जिल्ह्यात 3 मार्चला राष्ट्रीय लोकअदालत

अकोला, दि. 23 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची सूचना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांत राष्ट्रीय लोकअदालत दि. 3 मार्च रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 6 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.

या प्रकरणांवर सुनावणी होईल

लोकअदालतीत दाखलपूर्व प्रकरणांत धनादेश अनादर प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली, कामगारांचे वाद, करवसुली, वीज व पाणी देयके प्रकरणे, तसेच आपसात तडतोड करता येण्याजोगी फौजदारी, वैवाहिक व इतर दिवाणी वाद आदींबाबत सुनावणी होईल.

न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांत तडजोड करण्याजोगी फौजदारी प्रकरणे, धनादेश अनादर, बँक कर्जवसुली, मोटार अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, वैवाहिक वाद, कामगारांचे वाद, सेवाविषयक वेतन, भत्ते, सेवानिवृत्ती लाभ आदी, महसूल प्रकरणे, भाडे, वहिवाट हक्क, मनाई हुकूम दावे, विशिष्ट कराराची पूर्तताविषयक वाद आदींबाबत सुनावणी होईल.

दोन्ही पक्षांना मिळतो लाभ

लोकअदालतीच्या निवाड्याबद्दल अपील नाही. त्यामुळे कोर्टकचेरीतून कायम सुटका होते. खटल्यात साक्षी पुरावा, उलटतपासणी, दीर्घ युक्तीवाद आदी बाबी टाळल्या नाही. निकाल तत्काळ लागतो. निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. सामंजस्य वाढते. वेळ व पैश्याची बचत होते. निकाली निघणा-या प्रकरणांत कोर्ट फीची रक्कम परत मिळते.

पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन प्रलंबित अथवा दाखलपूर्व प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यासाठी तालुका विधी सेवा समिती किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. एस. तिवारी व सचिव योगेश पैठणकर यांनी केले आहे.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ