माजी सैनिकांसाठी रविवारी अमरावतीत मेळावा

 

माजी सैनिकांसाठी रविवारी अमरावतीत मेळावा

अकोला, दि. 10 : माजी सैनिक व दिवंगत सैनिकांच्या कुटुंबियांसाठी दि. 14 जानेवारीला मेळावा अमरावती येथील जोग स्टेडियम येथे सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात सीएसडी कँटिन, आर्मी अभिलेख कार्यालय, इसीएचएच, बँक स्पर्श, स्नेहभोजन आदी सुविधा उपलब्ध असतील. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व वर्धा या पाच जिल्ह्यातील माजी सैनिक सहभागी होतील. या मेळाव्यात अकोला जिल्ह्यातील माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम