मानसिक आजारांबाबत समुपदेशनासाठी टेलीमानस सेवेचा वापर करावा

 

मानसिक आजारांबाबत समुपदेशनासाठी

टेलीमानस सेवेचा वापर करावा

अकोला, दि. 1 : नैराश्य, चिडचिड, स्मृतीभ्रंश, व्यसन व इतर मानसिक आजारांसाठी टेलीमानस १४४१६ (एक चार चार एक सहा) या टोल फ्री सेवेचा वापर करावा, असे आवाहन बार्शिटाकळी तालुक्यातील धाबा येथे मंगळवारी आयोजित तणावमुक्ती शिबिरात करण्यात आले.

जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्पात उपसंचालक तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना हाडोळे यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम झाला. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्वप्नील करवंदे यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ता अशोक जाधव, सोपान अंभोरे, मनोविकृती परिचारिका प्रतिभा तिवाणे, रिना चोंडकर उपस्थित होते.

 गरजू रुग्णांना यावेळी औषधोपचार व समुपदेशन करण्यात आले.  सय्यद आरिफ, कविता रिठ्ठे, अधिकारी व कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका यांनी सहकार्य केले.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ