ज्वारी , बाजरी व मका हमीभाव नोंदणीसाठी मुदतवाढ

 

ज्वारी , बाजरी व मका हमीभाव नोंदणीसाठी मुदतवाढ

अकोला, दि. 18 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेत हमी भावाने खरेदीसाठी ज्वारी, बाजरी व मका पीकांसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत दि. 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विपणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी दिली.

संकरित ज्वारीसाठी 3 हजार 180 रू., मालदांडी ज्वारीसाठी 3 हजार 225 रू. मक्यासाठी 2090 रू व बाजरीसाठी 2 हजार 500 रू. हमीभाव आहे.

शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी एनईएमएल पोर्टलवर करण्यासाठी पिकाची नोंद असलेला  सातबारा, आधारलिंक असलेला बँकेचा खाते क्रमांक, आधारकार्डाची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक तसेच ऑनलाईन नोंदणी करतेवेळी शेतकऱ्यांचा स्वत:चा फोटो घेणे बंधनकारक आहे. पेमेंट प्रणाली पीएफएमएस असून, आधारलिंक असलेले बँक खाते असावे. संयुक्त बँक खाते घेता येणार नाही.

ज्वारी, मका, बाजरी उत्पादक शेतकरी बांधवांनी हमीभावाचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन श्री. शिंगणे यांनी यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना