राष्ट्रीय मतदार दिवस शाळांमध्ये साजरा होणार

 

राष्ट्रीय मतदार दिवस शाळांमध्ये साजरा होणार

अकोला, दि. 18 : लोकशाहीतील मतदानाचे महत्वाचे पुढच्या पिढीच्या मनावर बिंबविण्यासाठी 14 वा राष्ट्रीय मतदार दिवस दि. 25 जानेवारी रोजी जिल्ह्यातील विविध शाळांतून साजरा करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाकडून यंदाच्या मतदार दिनासाठी ‘नथिंग लाईक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर’ (मतदानासारखे दुसरे काही नाही, मी मतदान करणारच) ही थीम निश्चित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विविध शाळांतून साजरा करण्यात यावा, अशी सूचनाही अकोला मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना, तसेच शाळांना करण्यात आली आहे.  यानिमित्त थीमवर आधारित चित्रकला स्पर्धाही शाळांमध्ये घेतली जाणार आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना निवडणूक कार्यालयाकडून प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ