प्रजासत्ताक दिन सोहळा; विविध दलांच्या सादरीकरणाला उपस्थितांची दाद विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधन परंपरेचे दर्शन
प्रजासत्ताक दिन सोहळा;
विविध दलांच्या सादरीकरणाला उपस्थितांची दाद
विद्यार्थ्यांच्या
सादरीकरणातून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधन परंपरेचे दर्शन
अकोला, दि. 26 : भारतीय
प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त लालबहादूर शास्त्री क्रीडांगणात आयोजित
मुख्य शासकीय सोहळ्यात विविध सुरक्षा दले, शाळा, महाविद्यालये, संस्थांनी केलेल्या
सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
महाराष्ट्र माध्यमिक शाळेच्या
विद्यार्थ्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पंजाबराव देशमुख अशा विविध महापुरूषांच्या वेशभूषेत
त्यांचा संदेश प्रसारित करत महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाच्या परंपरेचे दर्शन घडवले.
जिल्हा पोलीस दल, पोलीस
प्रशिक्षण केंद्र, गृहरक्षक दल, राष्ट्रीय विद्यार्थी सेना, स्काऊट- गाईड यांनी शिस्तबद्ध
कवायतीचे सादरीकरण केले, पोलीस वाद्यवृंद पथक, श्वानपथक, नॅशनल मिलिट्री स्कूल, बिनतारी
संदेश विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, क्रीडा विभाग आदींनी केलेल्या सादरीकरणाला उपस्थितांनी
दाद दिली. ‘भारतमाता की जय’च्या जयघोषाने आसमंत निनादून गेले होते.
वाहतूक नियमांचे उल्लंघन
केल्यास घडणा-या दुष्परिणामांची जाणीव करून देणारा रस्ता सुरक्षा अभियानाच्या सादरीकरणातील
‘यमराज’ही लक्षवेधी ठरला. गुरूनानक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर कवायती सादर
केल्या. महिला व बालविकास विभागातर्फे सादरीकरणात भारतमातेचे दर्शन घडवून महिला सक्षमीकरणाचा
संदेश दिला. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरूण या सोहळ्याला
मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणा-या विविध अधिकारी, कर्मचारी,
संस्था- संघटनांचे प्रतिनिधींचा गौरव यावेळी करण्यात आला.
०००


.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा