रस्ते सुरक्षितता अभियानात 25 स्वयंसेवकांना प्रशिक्षण

 


रस्ते सुरक्षितता अभियानात 25 स्वयंसेवकांना प्रशिक्षण

अकोला, दि. १२ : रस्ते सुरक्षितता अभियानात 18 ते 29 वर्षे या वयोगटातील 25 स्वयंसेवकांना वाहतूक पोलीसांच्या सहकार्याने वाहतूक सुरक्षिततेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. नेहरू युवा केंद्र व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण कार्यशाळाही  गुरूवारी (दि. 11 जानेवारी) घेण्यात आली.

संस्थेचे प्राचार्य डॉ. एस बी घोंगडे, परिवहन विभागाचे किरणकुमार लोणी, वाहतूक पोलीस शाखेचे ज्ञानेश्वर वरणकर, संजय इंगळे,  सी. डी. शेळके सर, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक विकास जाधव आदींनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. वाहतुकीचे नियम, हेल्मेटचे महत्व, सुरक्षिततेची सूत्रे यावेळी सांगण्यात आली.  जिल्हा युवा अधिकारी महेश सिंह शेखावत यांच्या हस्ते मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सर्व स्वयंसेवकांना ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून प्रत्यक्षरीत्या वाहतूक नियमांचे धडे देण्यात येत आहेत.  स्वयंसेवक सागर चौधरी, राधा खंडारे, अमोल भटकर, नितीन मोगरे आदी उपस्थित होते.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ