राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

 राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन  

                        

 अकोला, दि. 23 : जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे चौदाव्या राष्‍ट्रीय मतदार दिवसानिमित्त दि. 25 जानेवारी रोजी जिल्ह्यात रॅली व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,. 

 जिल्हाधिकारी अजित कुंभार व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुरूवारी सकाळी 8 वा. अशोक वाटिका चौक अकोला येथून मतदार जागृती प्रभात फेरी काढण्यात येईल. त्यानंतर सकाळी 9 वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालय चौक  येथे श्रीमती पंचफुलाबाई पाटील समाजकार्य महाविद्यालयामार्फत मतदार जागृती विषयावर पथनाट्य सादर होईल.

याचवेळी छत्रपती सभागृह, नियोजन भवन येथे रांगोळी स्पर्धाही होणार आहे. तिथेच सकाळी 11 वा. वक्तृत्व स्पर्धा होईल. राष्ट्रीय मतदारदिनाच्या पार्श्वभूमीवर विविध शाळा, महाविद्यालयांत रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिली.

            ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ