गुरव व वीरशैव लिंगायत समाजासाठी महामंडळे कार्यान्वित

 

गुरव व वीरशैव लिंगायत समाजासाठी महामंडळे कार्यान्वित

अकोला, दि. 15 : राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत राज्यातील गुरव व वीरशैव लिंगायत समाजाच्या आर्थिक विकासासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ या दोन महामंडळांची स्थापना करण्यात आली आहे. 

या महामंडळांमार्फत राज्यातील गुरव व वीरशैव लिंगायत समाजातील गरजू व पात्र व्यक्तींना महामंडळाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक विकास साध्य करण्यासाठी स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. गुरव व वीरशैव लिंगायत बांधवांनी या महामंडळाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, द्वारा किरण देशमुख, तापडिया नगर, गल्ली क्र. 3, अकोला येथे किंवा (0724) 2410221 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ