खरीपाची अंतिम पैसेवारी जाहीर

 

खरीपाची अंतिम पैसेवारी जाहीर

अकोला, दि. २ : खरीप पिकांबाबत सन २०२३-२४ साठी तहसील कार्यालयांनी सादर केलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार १२ गावांपैकी  ९९० गावांची  पैसेवारी  काढण्यात आली असून, ती ४८  पैसे इतकी आहे. 

अकोला तालुक्यातील  181 गावांची , अकोट तालुक्यातील 185 गावांची, तेल्हारा तालुक्यातील  106 गावांची, बाळापुर तालुक्यातील 103 गावांची, पातूर तालुक्यातील  94 गावांची पैसेवारी काढण्यात आली. ती ४८ पैसे आहे. मुर्तिजापुर तालुक्यातील 164 गावांची पैसेवारी काढण्यात आली. ती ४६ पैसे आहे. बार्शिटाकळी तालुक्यातील 157 गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे, अशी माहिती महसूल प्रशासनातर्फे देण्यात आली.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ