‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’बाबत महाविद्यालयांत जनजागृती

‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’बाबत महाविद्यालयांत जनजागृती

अकोला, दि. ५ : मतदानप्रक्रिया, तसेच ‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’बाबत नवमतदारांना माहिती मिळावी, यासाठी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यानुसार  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत आज कार्यक्रम घेण्यात आला.

मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी यावेळी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रत्‍येक विद्यार्थ्‍याने ‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’द्वारे प्रात्‍यक्षिक मतदान करण्‍याचा अनूभव घेतला. नवमतदारांच्या अनेक शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले. तलाठी ज्योती कराळे, कार्तिक वानखडे व रश्मी पठाण यांनीही मार्गदर्शन केले.

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून ‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’बाबत प्रशिक्षण, प्रसार प्रसिध्दी व जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत. प्रत्‍येक मतदान केंद्राच्या ठिकाणी व त्या परिसरात पथक नेमून प्रसिध्‍दी व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येत आहेत.

स्वीप नोडल अधिकारी मनोज बोपटे, विस्‍तार अधिकारी (कृषी) आनंद डिक्‍कर यांनी परिश्रम घेतले. प्राचार्य सुनील घोंगडे, मंगेश पुंडकर, विजय धुरतकर, श्री. काळे आदी उपस्थित होते.

०००

 



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ