समता पर्व;मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात आत्म संरक्षणाचे धडे



         अकोला,दि. ३० (जिमाका)-: समतापर्वांतर्गत येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात आत्म संरक्षणासाठी कराटे, बॉक्सींग प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला.

               २६ नोव्हेंबर संविधान दिन आणि ६ डिसेंबर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणदिना दरम्यान राज्यात समता पर्व साजरे होत आहे. अकोला जिल्ह्यातही समता पर्वा निमित्ताने विविध आयोजन करण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात आत्म संरक्षणासाठी  कराटे, बॉक्सींगचे  प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. क्रीडा परिक्षक सपना विरघट आणि स्वाती टेकाडे यांनी वसतीगृहाच्या विद्यार्थीनींना कराटे, बॉक्सींगचे प्रात्यक्षिके करून घेतली व मार्गदर्शन केले.  

                                                                     ०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ