प्रमिलाताई ओक सभागृहामध्ये ‘पुस्तक प्रदर्शन व विक्री’


अकोला,दि.28 (जिमाका)-: राष्ट्रीय पुस्तक न्यासच्यावतीने ९ ते १८ डिसेंबर २०२२ दरम्यान येथील प्रमिलाताई ओक सभागृहामध्ये ‘पुस्तक प्रदर्शन व विक्री’चे आयोजन करण्यात येणार आहे.

        केंद्रीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या मुंबई स्थित पश्चिम विभागीय कार्यालय या पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करणार आहे. शहरातील मुख्य बसस्थानकाशेजारील प्रमिलाताई ओक सभागृहात दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी  खुले राहणार आहे. या पुस्तक प्रदर्शनात मराठी ,हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तके छापील किंमतीपेक्षा १०टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रदर्शनीस जास्तीत- जास्त संख्येने पुस्तकप्रेमींनी भेट  देण्याचे आवाहन प्रदर्शन प्रभारी रविंद्र मोहोड यांनी केले आहे.  

                                                      ०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम