पक्षी सप्ताहानिमित्तः विशेष लेख: अकोल्याचे पक्षी वैभव

 









अकोल्याचे पक्षी वैभव

            अकोला जिल्ह्याचा  बहुतांश भूभाग जैवविविधतेने संपन्न आहे. ट्रॉपीकल ड्राय झोन,सातपुड्याच्या पर्वतरांगागवताळ माळरानशुष्क पानगळीची वनेअभयारण्य या हिरवाईमुळे. तसेच नदीधरणे ,तलाव व जलाशय आदी पाणथळीच्या ठिकाणांमुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणात पक्षी आकृष्ट होवून त्यांचा अधिवास वाढला आहे,  परिणामी जिल्हाला पक्षी वैभव लाभले आहे.

              अकोला जिल्हाचा ट्रॉपीकल ड्राय झोनमधे समावेश आहे. उत्तरेकडे सातपुड्याच्या गाविलगड पर्वतरांगांमधे नरनाळापुर्वेकडे गवताळ माळरानदक्षिणेकडे शुष्क पानगळीची वने तर पश्चिमेकडे गवताळ माळराने व खुरट्या वनस्पतीं आहे. अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा अभयारण्य  तसेच मेळघाटच्या काही भागाशिवाय  काटेपूर्णा व मोर्णा नदीसह पोपटखेडमहानदगडपारवामोर्णा धरणा शिवाय बोरगाव मंजूकापशी कुंभारीविझोराअखतवाडा शिवाय लहान लहान तलाव व जलाशय असून पाणथळी चे ठिकाणगवतळ व खुले रानमाळाशेतजमीन सोबतच कृषी विद्यापीठ चे वनक्षेत्र लाभले असल्या कारणाने इथे पक्ष्यांची पण विविधता दिसून येते.

                पक्ष्यांना योग्य अधिवास व पोषक वातावरण मिळत असल्याने भरपूर प्रमाणात पक्ष्यांमध्ये वैविध्यता पहायला मिळते. स्थानिक पक्षी राघूमैनाहळद्यादयाळसुभगखबुतरखाटीकचंडोलसुतारहुदहुदपोपटघुबडचिरकवटवट्यातितरघरगरुडबदककरकोचे इतर प्रजातीच्या पक्षी जिल्ह्यात येतात. तसेच, देशाच्या विविध राज्यांतून स्थलांतर करणाऱ्या वारकरीहळदी कुंकूकमळ पक्षीजांभळी पाणकोंबडीराखी बगळाजांभळा बगळाशराटीपाणकावळेदर्दीमुखचक्रवाक या पाणपक्ष्यांसह गडवालथापट्यादलदली ससाणासाधा करकोचा आदी पक्षांचाही जिल्ह्यात वावर आढळतो.  विदेशातून जसे की  युरोपरशियामंगोलियासायबेरिया कडून विदेशी लांब पल्याचे पक्षी  मालगुजा godvit, तुतारी Stint, ससाणा falcon, कलहंस grayleg Goose, पट्टकदम Bar-headed goose, कौंच cranes, युरेशियन नीलपंख European Roller सारख्या प्रजाती पक्षीही जिल्ह्या आढळतात.

               जिल्ह्यातील विविध भागांत  पक्षांच्या आवडत्या दीवासात झाडीमाळरानात पाणवठ्यांवर काही काळ थांबून ते परत जातात.  या स्थलांतरकाळात पक्ष्यांचे कमी-अधिक प्रमाणात दर्शन घडत असते कधीतरी नशिबाने एखाद्या दूर्मीळ पक्षी पण दर्शन देवून जातात.  आतापर्यंत अकोला जिल्हाचे पक्षीनिरीक्षण करताना जिल्ह्यात एकूण ३४६ पक्ष्यांची नोंद झाली असून त्यांची वर्गवारी ७० प्रजाती कुटुंबात करण्यात येतेयातील जवळपास १८८  प्रजाती निवासी पक्षी आहेत तर १५८  प्रजाती स्थलांतरित पक्षी आहेत.  यातील  बरेच पक्षी  हे हिवाळ्यात  स्थलांतर करणारे आहेत तर पावसाळ्याच्या सुरवातीला व पावसाळ्यात पण हे  पक्षी स्थलांतर करुन येतात. काही पक्षी निवासी स्थलांतरन  करणारेप्रजनन स्थलांतरित करणारे आणि काही न थांबता निघून जाणारे तर काही भटक्या प्रजाती (कधीतरी दिसणारे) दूर्मीळ पक्षांच्या प्रजातींची नोंद घेतल्या गेली आहे.अकोला जिल्ह्यातील पक्ष्यांच्या नोंदी करताना शहरातील इतर पक्षीप्रेमी  मित्रांचे सहकार्य लाभत आहे. पक्षांची जैवविविधता हा निसर्गातील महत्त्वाचा घटक असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्यांचे संवर्धन करण्यात सहकार्य करावे. 

  

  देवेंद्र तेलकर

लेखक, वन्यजीव अभ्यासक आहेत .

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ