खंडलेवाल भवन येथे आज (बुधवार दि.23)पासून जनजातीय कृषी महोत्सवास प्रारंभ


अकोला,दि. 22(जिमाका)- ॲग्रीकल्चर इंजिनिअर्स सोसायटी  फॉर ट्रायबल डेव्हलपमेंट व आदिवासी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त दि.23 ते 25 नोव्हेंबर 2022 दरम्यान खंडलेवाल भवन, नेहरु पार्क चौक, अकोला येथे सकाळी 8 ते रात्री 8 वा.30 मि.पर्यंत जनजातीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शनी तसेच जागतिक स्तरावरील वरिष्ठ शास्त्रज्ञांव्दारे कृषी विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांच्याहस्ते होणार असून प्रमुख अतिथी आदिवासी विकास विभाग अमरावतीचे अपरआयुक्त सुरेश वानखडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे, तर मार्गदर्शक म्हणून सातपुडा नॅचरल फार्मर प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष रुपेश पाटील लडे उपस्थित राहणार आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ