कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘11’ पॉझिटीव्ह; दोन डिस्चार्ज


 अकोला दि.15(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 85  अहवाल प्राप्त झाला. त्यात 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्हर-आरटीपीसीआर(शा.वै.म. 11 व खाजगी 0)11+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 11.

आरटीपीसीआर ‘11’ पॉझिटीव्ह

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात तीन पुरुष व आठ महिलांचा समावेश असून हे रुग्ण पातूर व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित सात रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

दोन डिस्चार्ज

आज दिवसभरात दोघांला डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘22’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66023(49890+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 22 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ