जिल्हा कोषागार कार्यालयात वेतन पडताळणी पथक; 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान होणार पडताळणी


अकोला, दि.9(जिमाका):- जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण कार्यालयातील मार्च-2023 पर्यंत सेवा निवृत्त होणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक पडताळणीकरीता वेतन पडताळणी पथक जिल्हा दौऱ्यावर येत आहे. हा पथक सोमवार दि. 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान जिल्हा कोषागार कार्यालय, अकोला येथे सेवापुस्तक पडताळणी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने संबधित कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे मुळ सेवापुस्तके ऑनलाईन प्रणालीव्दारे पडताळणीकरीता सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मनजित गोरेगावकर यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम