कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘एक’ पॉझिटीव्ह; एकाचा मृत्यू


 अकोला दि.17(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 52  अहवाल प्राप्त झाला. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यूची नोंद झाली, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्हर-आरटीपीसीआर(शा.वै.म. 1 व खाजगी 0)1+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 1.

आरटीपीसीआर ‘एक’ पॉझिटीव्ह

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका महिलेचा समावेश असून हा रुग्ण मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

एकाचा मृत्यू

आज दिवसभरात एकाचा मृत्यूची नोंद झाली. हा रुग्ण लोणार जि. बुलडाणा येथील 16 वर्षाची युवती असून दि. 16 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे तिचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 14 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून

देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘30’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66033(49900+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 30  सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ