बालगृहातील अनाथ बालकांना ‘रेशन कार्ड’ वाटप


अकोला दि.24(जिमाका)- जिल्हा महिला व बालविकास विभागांतर्गत गायत्री बालीकाश्रम व सुर्योदय बालगृहातील अनाथ बालकांना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते गुरुवार 24 नोव्हेंबर २०२२ रोजी  रेशन कार्डचे  वाटप  करण्यात आले. बालगृहातील अनाथ बालकांना अन्नधान्य योजनेचा लाभ मिळावा याकरिता अन्नधान्य वितरण अधिकारी प्रतिक्षा तेजनकर यांच्या पुढाकाराने गायत्री बालीकाश्रमातील 10 बालिका व सुर्योदय बालगृहातील 30 प्रवेशितांना राशन कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परीवीक्षा अधिकारी गिरीश पुसदकर, बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड.अनिता गुरव, बालन्याय मंडळाच्या सारीका घिरणीकर, डॉ. जावेद खान, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, सुर्यादय बालगृहाचे  प्रशांत देशमुख, गायत्री बालकाश्रमाच्या भाग्यश्री घाटे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, सुनिल सरकटे, नितीन अहीर आदि उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ