पातुर तालुक्यात ढाब्यावरुन बालकामगाराची मुक्तता
अकोला, दि.४(जिमाका)- पातुर तालुक्यात जिल्हा बालकामगार कृतीदलाने धाड टाकून राजस्थानी ढाब्यावरुन एका बालकामगारास मुक्त केले असून ढाबा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक कामागर
आयुक्त, अकोला यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, सहाय्यक कामगार आयुक्त
राजू गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा
बालकामगार कृतीदलाने गुरुवारी (दि.३) ही कारवाई केली. या पथकात सरकारी कामगार
अधिकारी गौरव कुमार नालिंदे, दुकान निरीक्षक विनोद जोशी, किरण राठोड, पोलीस कॉस्टेबल
मयुर उमाळे, नितीन अहीर यांचा समावेश
होता. या पथकाने गुरुवारी रामदेव रायका, राजस्थानी धाबा,
ता. पातुर जि. अकोला येथे धाड टाकुन एका बाल कामगाराची मुक्तता केली. या प्रकरणी ढाबा मालक सुरेश
रुपाराम बिष्णोई यांचे विरुद्ध पातुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील व्यापारी
व औद्योगिक आस्थापना मालकांनी कुणीही बाल
कामगार कामावर ठेवु नये, अन्यथा त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन सहाय्यक
कामगार आयुक्त रा. दे. गुल्हाने यांनी केले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा