पक्षी सप्ताहानिमित्त शहरात पक्ष्यांच्या नावे आरोग्य ठेवा जपण्याचा स्तुत्य उपक्रम

 



अकोला दि.12(जिमाका)- पक्षी सप्ताहा निमित्ताने पक्ष्यांच्या नावावर आधारित आसनांची माहिती व त्याचे फायदे प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा स्तुत्य उप्रकम केडिया प्लॉट, अकोला येथील अजिंक्य फिटनेस पार्क आणि आयुर्वेदिक कॉलेज कॉम्प्लेक्सने केला आहे.  

भारतीय पक्षी विश्वाचा अभ्यास जागतिक स्तरावर पोहोचवनारे पै. डॉ.सालिम अली व महाराष्ट्रातील तमाम पक्षी निरीक्षकांसाठी कायम आदरस्थानी असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय मारुती चितमपल्ली या दोन्ही उत्तुंग व्यक्तींचा जन्मदिवस हा नोव्हेंबर महिन्यात येतो. या निमित दि. 5 ते 12  नोव्हेंबर पर्यंतचा आठवडा पक्षीसप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असतो. पक्ष्यांच्या नावे असणारा आरोग्य ठेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या स्तुत्य हेतूने या दोन्ही संस्थांनी पक्षी सप्ताहा दरम्यान प्रत्येक दिवसाला पक्ष्यांच्या नावावर आधारित आसनासंबंधी माहिती-त्याचे फायदे प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांपर्यंत पोहोचविले.

या उपक्रमांतर्गत "बकासन, मयुरासन, कुक्कुटासन, गरुडासन, टिट्टिभासन, राजकपोतासन, स्वर्गद्विजासन, क्रोनचासन" इत्यादी संबंधी माहिती, त्याचे फायदे व प्रत्यक्ष कृतीचा फोटो नागरिकांपर्यंत पोहोचवविण्यात आले. या उपक्रमात प्रशांत वाहूरवाघ, भूषण गावंडे, रोहन जांभे, धनंजय भगत यांनी पक्षांच्या नावावर आधारित आसनांचे प्रात्यक्षिक केलीत. योगाची प्रत्येक मुद्रा ही निसर्गात अस्तित्वात असलेल्या कोणत्या ना कोणत्या जीवाशी किंवा वस्तूशी संबंधित असते. त्यामुळे योगशास्त्रातील जाणकार ऋषीमुनींनी अनेक आसनांना पक्ष्यांची नावे दिली आहेत. अशाप्रकारे  नैसर्गिक घटकाचा योग/व्यायामाच्या माध्यमातून उपक्रमही ही या दोन्ही संस्था मार्गदर्शन करतात.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ