‘महारेशीम अभियान 2023’च्या रथास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी




अकोला,दि.23 (जिमाका) -  जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज महारेशीम अभियान-2023 कार्यक्रम’ या रथास हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. या रथाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यापक जनजागृतीमुळे अकोला जिल्ह्यात रेशीम उद्योगाला चालना देण्यास मदत होणार आहे.

       जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात  रेशीम उद्योगाबाबत माहिती  देणाऱ्या रथास शुभारंभ झाला. यावेळी उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा  रेशीम अधिकारी पी.बी.नरवाडे,प्रकल्प अधिकारी आर.बी.ठाकरे आणि क्षेत्र सहायक एस.यु.मानकर यांच्यासह जिल्हा  रेशीम  कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या रथाच्या माध्यमातून १५ डिसेंबर २०२२ पर्यंत जिल्ह्यात सर्वदूर ‘महारेशीम अभियान-2023 कार्यक्रमा’ ची सर्वंकश माहिती बॅनर ,पांपलेट आदि  छापील माध्यमांसह डिजीटल माध्यमातून देण्यात येणार आहे.

         अकोला  जिल्ह्यात रेशीम शेती उद्योग वाढीसाठी वाव असून हा एक उत्तम शेतीपूरक व्यवसाय ठरू शकतो. बारमाही सिंचनाची सोय व उद्योगाच्या सुरुवातीस खर्च करण्याची तयारी असलेल्या शेतकऱ्यांनी  जिल्हा रेशीम कार्यालय, एम.आय.डी.सी.फेज-1 प्लॉट नं. 8,9 10 शिवर,चिमा स्पोर्ट रोड,शक्ती ट्रिडस जवळ,अकोला येथे संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा रेशीम अधिकाऱ्यांनी केले आहे.

                                                                     00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ