रस्ता वाहतूक अपघातात बळी ठरलेल्या नागरिकांचा जागतिक स्मृती दिन: उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे ‘वॉकेथॉन’








 अकोला,दि.२०(जिमाका)- रस्ता वाहतूक अपघातात बळी ठरलेल्या नागरिकांसाठी जागतिक स्मृती दिनानिमित्त (World day of remembrance for road traffic victim) येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अकोला च्या वतीने वॉकेथॉनचे आयोजन करुन वाहतुक नियमांविषयी जनजागृती करण्यात आली.

 येथील संत तुकाराम चौक ते आरटीओ मैदान पर्यंत या वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. रस्ता अपघातग्रस्ताचे वडील राजेंद्र देशमुख यांनी हिरवी झेंडी दाखविली. या रॅलीत माननीय उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला ,उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, एनसीसीचे छात्र, पीडीकेव्ही कॉलेज, एल आर टी कॉलेज, आर एल टी कॉलेज, सीताबाई आर्ट्स कॉलेज ,श्री शिवाजी कॉलेज ,माउंट कार्मेल स्कूल, खंडेलवाल स्कूल ,श्रीमती देवकाबाई देशमुख प्राथमिक विद्यालय ,स्कूल ऑफ स्कॉलर्स इत्यादी चे विद्यार्थी व अस्तित्व फाउंडेशन एनजीओ, प्रभात किड्स स्कूल बस चालक ,एमएसआरटीसी बस चालक, ट्रॅफिक पोलीस, मोटर ड्रायव्हिंग स्कूल, ऑटो डीलर्स ,PUC संचालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशन आदींचा सहभाग होता.

वॉकेथॉन रॅली आरटीओ मैदानावर पोहोचल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती जयश्री दुतोंडे यांनी रॅलीला संबोधित करून त्यांनी स्वलिखित  रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा दिली. स्कूल ऑफ स्कॉलर्स च्या बाल कलाकारांनी पथनाट्य "तू तुझा रक्षक" सादर करून रस्ता सुरक्षा नियम पाळणे बाबत संदेश दिला. रस्ता अपघातात आपला जीव गमावलेल्या नागरिकांसाठी एक मिनिट स्तब्ध राहून त्यांना श्रद्धांजली वाहनात आली. रस्ता अपघातात बळी ठरलेल्या व्यक्तिंचे कुटुंबिय असलेले भीमराव जाधव व प्रमोद इंगळे यांचीही यावेळी उपस्थिती होती. श्रीमती जयश्री दुतोंडे मॅडम यांनी रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सहायक मोटर वाहन निरीक्षक मनोज शेळके, प्रास्ताविक मोटर वाहन निरीक्षक हेमंत खराबे व आभार प्रदर्शन सहायक मोटर वाहन निरीक्षक लेनिन ढाले यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ