अकोला जिल्ह्यात ‘सामाजिक न्याय पर्वाचे आयोजन’; संविधानाविषयी जागृतीसाठी वैविद्यपूर्ण आयोजन


अकोला,दि.24 (जिमाका) - अकोला  जिल्ह्यात दि. 26 नोव्हेंबर  ते 6 डिसेंबर 2022  दरम्यान  ‘सामाजिक न्याय पर्व’ साजरे करण्यात येणार असून  याअंतर्गत भारतीय संविधानाविषयी  जागृती  करण्यासाठी शासकीय शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी दिली आहे.    

       भारतीय  संविधानाविषयी  नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टीने दरवर्षी 26 नोव्हेंबर हा ‘संविधान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याअनुषंगाने अकोला जिल्ह्यात ‘सामाजिक न्याय पर्व म्हणून साजरा करण्यात येणार  आहे. सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या  जिल्ह्यातील सर्व शासकीय निवासी शाळा,सर्व शासकीय वसतीगृह,समाजकार्य महाविद्यालय,विजाभज आश्रम शाळा तसेच समान संधी केंद्र स्थापन केलेल्या सर्व महाविद्यालयात भारताचे संविधान या विषयावर प्रश्नमंजुषा, बहुपर्यायी प्रश्न परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.  

       सामाजिक न्याय पर्वांतर्गत संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे. नागरिकांचे हक्क व कर्तव्ये आदी विषयांवर व्याख्यानांचे आयोजन, विद्यार्थ्यांकडून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे लेखन करून घेण्यात येणार असल्याचे  डॉ. राठोड यांनी सांगितले आहे.

                                                                     ०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ