ज्योती जानोळकर विद्यालय येथे कायदेविषयक मार्गदर्शन


        अकोला,दि.25 (जिमाका) – जिल्हा महिला व बालविकास विभागांतर्गत बालकल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 22 नोव्हेंबर रोजी स्व.ज्योती जानोळकर विद्यालय,अकोला येथे बालकांचे अधिकार व हक्क याबाबत मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शीका बालकल्याण समिती सदस्य प्रांजली जैस्वाल, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर, सुनिल सरकटे व रेवत खाडे यांनी पॉक्सो कायदा, चाईल्ड लाईन १०९८, बालकांचे हक्क अधिकार व कायदे याबाबत  मार्गदर्शन केले. यावेळी शाळेच्या संचालक स्मिताताई जानोळकर, मुख्याध्यापक गोपाल काळे व शाळेमधील सर्व शिक्षक, कर्मचारी आदि उपस्थित होते.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ