कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘चार’ पॉझिटीव्ह; दोन डिस्चार्ज


 अकोला दि.11(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 72  अहवाल प्राप्त झाला. त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 4 व खाजगी 0)4+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 4.

आरटीपीसीआर ‘चार’ पॉझिटीव्ह

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात चार महिलांचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर येथील एक तर उर्वरित तीन जण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

दोघांला डिस्चार्ज

आज दिवसभरात दोघांला डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘12’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66005(49872+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 12 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना