पदवीधर मतदार नोंदणी सुटीच्या दिवशीही सुरु

 अकोला,दि.४(जिमाका)- अमरावती विभाग पदवीधर मतदार संघात नव्याने मतदार नोंदणीसाठी मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी पदवीधारक मतदारांना आपली नोंदणी करता यावी यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी केंद्र हे शनिवार दि.५ व रविवार दि.६ या सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहेत.  तसेच पदवीधरांना मतदार नोंदणीसाठी भरावयाचा फॉर्म नं.१८ ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.ज्यांना ऑफलाईन पद्धतीने आपले नाव नोंदवायचे असेल त्यांच्यासाठीही ऑफलाईन सुविधा उपलब्ध आहे, मतदारांनी नाव नोंदणी करावी. ऑनलाईन नोंदणीसाठी पात्र मतदारांनी https://ceoelection.maharashtra.gov.in/graduate/  या लिंकवर जाऊन आपली नोंदणी करावी. ही लिंक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.akola.nic.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे. ऑफलाईन पद्धतीने ज्यांना नाव नोंदणी करावयाची आहे, त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरुन  पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे जमा करावे, असे आवाहन श्रीमती अरोरा यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना