निवृत्तीवेतनधारकांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

    अकोला, दि.४(जिमाका)- अकोला जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक,कुटुंब निवृत्तीवेतन धारक,माजी आमदार यांच्यासह अन्य सर्व राज्य निवृत्तीवेतनधारकांनी या महिन्या अखेर पर्यंत (नोव्हेंबर २०२२) हयात प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मनजित गोरेगावकर यांनी केले आहे.

         निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्या निवृत्तीवेतनाची खाते असणाऱ्या बँकांमध्ये हयात प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करावी.  यासाठी विहित नमुन्यातील प्रमाणपत्र सर्व बॅंकांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. निवृत्तीवेतनधारकांनी आधार कार्ड,पॅनकार्ड दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे, असे जिल्हा कोषागार कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण न केल्यास माहे डिसेंबर २०२२ चे निवृत्तीवेतन काढण्यात येणार नसल्याचेही या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.                                                                                                                                         

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना