कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘सात’ पॉझिटीव्ह; तीन डिस्चार्ज


 अकोला दि.12(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 70  अहवाल प्राप्त झाला. त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर तिघांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 7 व खाजगी 0)7+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 7.

आरटीपीसीआर ‘सात’ पॉझिटीव्ह

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात तीन पुरुष व चार महिलांचा समावेश असून हे रुग्ण पातूर येथील दोन तर उर्वरित पाच जण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

तिघांला डिस्चार्ज

आज दिवसभरात तिघांला डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘16’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66012(49879+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 16 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ